Success stories in marathi – दीक्षा नावाच्या मुलीच्या संघर्षमय प्रवासाबद्दल हा लेख आहे. ज्यांचे बालपणापासूनच पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. या लेखामध्ये त्यांच्या शालेय जीवनातील उत्कृष्ट कामगिरी, कुटुंबांच्या अपेक्षामुळे त्यांनी घेतलेले निर्णय आणि पोलीस भरतीसाठी केलेले कठोर परिश्रम यावर लिहिले आहे. सुरुवातीच्या काळात अनेक अपयश येऊनही त्यांच्या जिद्दीमुळे त्यांनी अखेर मुंबई पोलीस दलात 2022 यावर्षी यश मिळवले.
नाव : दीक्षा सुनील शिंदे
पद : मुंबई पोलीस
इंस्टाग्राम अकाउंट : येथे क्लिक करा.
बालपण – Success stories in marathi
पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील दीक्षा यांचे लहानपणा पासूनच पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. सामान्य कुटुंबामधील मुलगी असल्यामुळे घरात चालू असलेल्या परिस्थितीची आणि आई-वडिलांच्या कष्टाची दीक्षा यांना जाण होती. शाळेमध्ये नेहमीच त्या अभ्यासामध्ये पुढे असायच्या, त्याचमुळे शिक्षकांच्या आवडत्या विद्यार्थ्यांनी बनल्या होत्या.
Diksha, who hails from Awasari in Pune’s Ambegaon taluka, had a childhood dream of becoming a police officer. Being a girl from a normal family, Diksha was aware of the situation going on at home and the hardships of her parents. In school, she always excelled in her studies, which made her the teacher’s favorite student.
१० वी १२ वी चा प्रवास (Success stories in marathi)
दहावी : दहावी पास झाल्यानंतर दीक्षा यांना कला शाखेमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा होती, परंतु कुटुंबीयांच्या आग्रहाखातर त्यांनी विज्ञान शाखेकडे प्रवेश घेतला. कुटुंबातील लोकांची व आई वडिलांची अपेक्षा पूर्ण करण्याकरिता त्यांनी विज्ञान शाखा निवडली. सुरुवातीला खूप आव्हान आली परंतु त्यांच्या जिद्दी स्वभावामुळे त्यांनी विज्ञान शाखेचा अभ्यासातही चांगली प्रगती दाखवली परंतु त्यांच्या मनामधील कलाशाखेच प्रेम मात्र त्याला शांत बसू देत नव्हतं.
बारावी : बारावी पास झाल्यानंतर दीक्षा यांच्यासमोर दोन पर्याय उपलब्ध होते एक म्हणजे कुटुंबांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि दुसरी म्हणजे त्यांचं लहानपणीपासूनच असलेलं स्वप्न पूर्ण करणे. पोलीस अधिकारी बनणे हे दीक्षा यांचं लहानपणापासूनच स्वप्न होतं दीक्षा यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत पोलीस भरती करिता तयारी सुरू केली. कठोर अभ्यास मैदानी चाचणीचा सराव आणि शिस्तबद्ध जीवनशैली याचा अवलंब करत त्यांनी पोलीस भरतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
After passing 10th standard, Deeksha wanted to take admission in Arts, but on the insistence of her family, she took admission in Science. He chose science branch to fulfill the expectations of family people and parents. At first there was a lot of challenge, but due to his stubborn nature, he showed good progress in the study of the science branch, but the love of the art branch in his heart did not let him sit still.
After passing class 12th, Diksha had two options, one was to fulfill her family’s expectations and the other was to fulfill her childhood dream. It was Diksha’s childhood dream to become a police officer. Diksha focused on his goal and started preparing for police recruitment. Following rigorous study field test practice and a disciplined lifestyle, he started his journey towards police recruitment.
हेही वाचा>>>>शिक्षण, संघर्ष, आणि जिद्द : दिपाली लंबतुरे यांचा प्रवास | Real life inspirational stories of success
Success stories in marathi – अपयश
दीक्षा शिंदे यांच्या संघर्षाचा प्रवास :
- 2016: पुणे शहर – वेटिंग लिस्टमध्ये नाव आले.
- 2017: ठाणे शहर – केवळ २ गुणांनी अपयश (परंतु महाराष्ट्र सुरक्षा बलात (MSF) निवड झाली).
- 2018: मुंबई शहर – केवळ ३ गुणांनी अपयश.
- 2019: पुणे शहर – पुन्हा वेटिंग लिस्टमध्ये नाव आले.
- 2020: कोविड – १९ मुळे कोणतीही परीक्षा झाली नाही
- 2023: मुंबई शहर – अखेर पोलीस दलात निवड झाली (MSF मधून राजीनामा दिला).
वर्ष 2016 मध्ये त्यांनी पोलीस भरती करता पहिल्यांदा अर्ज भरला परंतु प्रथमच वेळ असल्यामुळे त्यांना अपेक्षित यश साधता आले नाही. त्यानंतर पुढील वर्षी महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) मध्ये त्यांना नोकरी मिळाली, परंतु तरीही त्यांनी पोलीस होण्याचा स्वप्न सोडलं नाही. दररोज कामावरून घरी आल्यानंतर अभ्यास करणे, मैदान चाचणी सराव करणे या गोष्टी त्यांनी चालूच ठेवल्या. 2017 मध्ये आलेल्या भरतीमध्ये त्यांनी ठाणे पोलीस दलाकरिता अर्ज केला आणि त्यातही त्या केवळ दोन मार्कांनी अपयशी झाल्या. पुढे 2018 मध्ये आलेल्या भरतीमध्ये त्यांनी मुंबई पोलीस दलाकरिता अर्ज केला आणि त्यातही त्या केवळ तीन मार्कांनी अपयशी झाल्या.
In the year 2016, he applied for police recruitment for the first time, but due to the first time, he could not achieve the expected success. He then got a job in the Maharashtra Security Force (MSF) the following year, but still did not give up on his dream of becoming a policeman. After coming home from work every day, he continued to study and practice field tests. Later in the 2018 recruitment, she applied for the Mumbai Police Force and failed in that too by just three marks.
यश | Success stories in marathi
सलग तीन वेळा आलेल्या अपयशामुळे निराशा आली परंतु दीक्षा काही हार मानायला तयार नव्हत्या. त्यांनी पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात केली आणि 2022 यावर्षी मुंबई पोलीस दलामध्ये त्यांची निवड झाली आणि त्यांच्य स्वप्न पूर्ण झालं दीक्षा यांच्या यशा मागे आई-वडील यांचा खूप हात होता. दीक्षा यांनी आपलं यशाचा श्रेय आपले मित्र परिवार, कुटुंब आणि आई-वडील यांच्या पाठिंबाला दिले. दीक्षाच्या या यशस्वी कामगिरी मुळे तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू आले. आपली मुलगी खूपच जिद्दी आहे आणि जे हवं ते मिळवल्याशिवाय शांत बसत नाही याची त्यांना जाणीव ही झाली.
Three consecutive failures led to disappointment but Diksha was not ready to give up. He once again started his studies and in the year 2022 he got selected in the Mumbai Police Force and his dream came true. Deeksha attributes her success to the support of her friends, family and parents. Diksha’s successful performance brought tears of joy to her parents’ eyes. They realized that their daughter is very stubborn and will not rest until she gets what she wants.
दीक्षा यांचे लहानपणापासूनच असलेले पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न त्यांनी अखेर 2022 मध्ये पूर्ण केले. अनेक अपयशानंतरही त्या आपल्या जिद्दीने यशस्वी झाल्या. त्यांच्या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या कुटुंबीयांना तसेच मित्र परिवाराला दिले. दीक्षा यांच्या जिद्दीमुळे त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाने अश्रू आले.
Deeksha finally fulfilled his childhood dream of becoming a police officer in 2022. Despite many failures, she succeeded with her determination. He attributed his success to his family and friends. Deeksha’s stubbornness brought tears of joy to her parents’ eyes.