Shabdanchya jati Marathi vyakaran – हा लेख मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती घटका बद्दल आहे. यात शब्दांचे प्रकार, त्यांचे वर्गीकरण (विकारी आणि अविकारी ) आणि वाक्य निर्मितीतील त्यांची भूमिका स्पष्ट करते, ज्यामध्ये विशेषणे आणि क्रियाविशेषणांची उदाहरणे देखील समाविष्ट आहेत.
शब्दांची व्याख्या व महत्त्व – Shabdanchya jati Marathi vyakaran
- शब्द हा वाक्यातील महत्त्वाचा घटक आहे. ज्या अक्षर समूहाला काही अर्थ तयार होतो त्यास शब्द असे म्हणतात.
- शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत.
- शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत, त्यातील चार विकारी तर चार अविकारी आहेत.
प्रत्यय व प्रकृती-विकृती
- काही अक्षर समूह असे आहेत, त्यांना अर्थ नसतो, परंतु तो अक्षर समूह इतर अक्षर समूहांना जोडल्यास शब्दाचे रूप तयार होते. त्यास प्रत्यय असे म्हणतात.
- शब्दांना जसा अर्थ असतो, तसा प्रत्ययांना मात्र अर्थ नसतो.
- शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती तर त्याला प्रत्यय जोडल्यास विकृती असे म्हणतात.
विकारी शब्द : Shabdanchya jati Marathi vyakaran
- ज्या शब्दाचा लिंग, वचन आणि विभक्ती मध्ये बदल होतो, अशा शब्दांना विकारी शब्द म्हणतात.
- लिंग, वचन आणि विभक्ती मुळे बदल होणाऱ्या शब्दास विकारी (सव्यय) असे म्हणतात.
- शब्दांच्या 4 विकारी जाती आहेत:
- नाम (Nouns)
- सर्वनाम (Pronouns)
- विशेषण (Adjectives)
- क्रियापद (Verbs)
अविकारी शब्द
- ज्या शब्दाचा लिंग, वचन आणि विभक्ती मध्ये बदल होत नाही, अशा शब्दांना अविकारी शब्द म्हणतात.
- लिंग, वचन आणि विभक्ती मुळे बदल न होणाऱ्या शब्दांना अविकारी (अव्यय) असे म्हणतात.
- शब्दांच्या 4 अविकारी जाती आहेत:
- क्रियाविशेषण अव्यय (Adverbs)
- शब्दयोगी अव्यय (Prepositions)
- उभयान्वयी अव्यय (Conjunctions)
- केवलप्रयोगी अव्यय (Interjections)
हेही वाचा>>>>विशेषण (मराठी व्याकरण) | Visheshan mcq
विशेषण व क्रियाविशेषण (Shabdanchya jati Marathi vyakaran)
- विशेषण: नामा विषयी विशेष माहिती ज्या शब्दामुळे मिळते, त्यास विशेषण असे म्हटले जाते.
उदाहरणार्थ: “विवेक हा चांगला मुलगा आहे.” यातील “चांगला” हे विशेषण आहे. - क्रियाविशेषण: एखाद्या क्रियेविषयी विशेष माहिती ज्या शब्दामुळे मिळते, त्यास क्रियाविशेषण असे म्हटले जाते.
उदाहरणार्थ: “तो जोरात धावतो.” यातील “जोरात” हे क्रियाविशेषण आहे.
क्र. | प्रकार | व्याख्या | उदाहरण |
1 | विशेषण | नामा विषयी विशेष माहिती ज्या शब्दामुळे मिळते, त्यास विशेषण असे म्हटले जाते. | “विवेक हा चांगला मुलगा आहे.” यातील “चांगला” हे विशेषण आहे. |
2 | क्रियाविशेषण | एखाद्या क्रियेविषयी विशेष माहिती ज्या शब्दामुळे मिळते, त्यास क्रियाविशेषण असे म्हटले जाते. | तो जोरात धावतो.” यातील “जोरात” हे क्रियाविशेषण आहे. |
Shabdanchya jati Marathi vyakaran | वन लायनर
- शब्दांच्या जाती शब्द हा वाक्यातील महत्त्वाचा घटक आहे. ज्या अक्षर समूहाला काही अर्थ तयार होतो त्यास शब्द असे म्हणतात.
- काही अक्षर समूह असे आहेत त्यांना अर्थ नसतो परंतु तो अक्षर समूह इतर अक्षराचा समूहांना जोडल्यास शब्दाचे रूप तयार होते त्यास प्रत्यय असे म्हणतात.
- शब्दांना जसा अर्थ असतो तसा प्रत्ययांना मात्र अर्थ नसतो. शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती तर त्याला प्रत्येय जोडल्यास विकृती असे म्हणतात.
- शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत.
- शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत त्यातील चार विकारी तर चार अविकारी आहेत.
- शब्दांच्या 4 विकारी जाती आहेत त्या पुढील प्रमाणे : नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद.
वन लायनर – Shabdanchya jati Marathi vyakaran
- शब्दांच्या 4 अविकारी जाती आहेत त्या पुढील प्रमाणे : क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय.
- ज्या शब्दाचा लिंग, वचन आणि विभक्ती मध्ये बदल होतो अशा शब्दांना विकारी शब्द म्हणतात.
- ज्या शब्दाचा लिंग, वचन आणि विभक्ती मध्ये बदल होत नाही अशा शब्दांना अविकारी शब्द म्हणतात.
- लिंग वचन आणि विभक्ती मुळे बदल होणाऱ्या शब्दास विकारी (सव्यय) तर लिंग वचन आणि विभक्ती मुळे बदल न होणाऱ्या शब्दांना अविकारी (अव्यय) असे म्हणतात.
- विशेषण : नामा विषयी विशेष माहिती ज्या शब्दामुळे मिळते त्यास विशेषण असे म्हटले जाते. उदाहरणार्थ: विवेक हा चांगला मुलगा आहे.
- क्रियाविशेषण : एखाद्या क्रियेविषयी विशेष माहिती या शब्दामुळे मिळते त्यास क्रियाविशेषण असे म्हटले जाते.
Shabdanchya jati Marathi vyakaran – शब्दांच्या जाती प्रश्न भाग १
प्रश्न : शब्दांच्या जाती किती?
- आठ
- सोळा
- चार
- दोन
प्रश्न :शब्दांच्या जाती पैकी खालीलपैकी कोणती जात विकारी आहे?
- नाम
- क्रियाविशेषण अव्यय
- शब्दयोगी अव्यय
- केवलप्रयोगी अव्यय
प्रश्न :शब्दांच्या विकारी जाती किती?
- चार
- तीन
- दोन
- एक
प्रश्न :शब्दांच्या अविकारी जाती किती?
- चार
- तीन
- दोन
- एक
प्रश्न : शब्दाचा लिंग, वचन आणि विभक्ती मध्ये बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात?
- विकारी शब्द
- अविकारी शब्द
- शब्दयोगी अव्यय
- उभयान्वयी अव्यय
क्र. | प्रश्न | उत्तर |
1 | शब्दांच्या जाती किती? | 8 |
2 | शब्दांच्या जाती पैकी खालीलपैकी कोणती जात विकारी आहे? | नाम |
3 | शब्दांच्या विकारी जाती किती? | 4 |
4 | शब्दांच्या अविकारी जाती किती? | 4 |
5 | शब्दाचा लिंग, वचन आणि विभक्ती मध्ये बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात? | विकारी शब्द |
शब्दांच्या जाती प्रश्न भाग 2 | Shabdanchya jati Marathi vyakaran
प्रश्न :ज्या शब्दाचा लिंग, वचन आणि विभक्ती मध्ये बदल होत नाही अशा शब्दांना काय म्हणतात?
- अविकारी शब्द
- विकारी शब्द
- शब्दयोगी अव्यय
- उभयान्वयी अव्यय
प्रश्न :खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
- दीपक लांब काठी आणण्यासाठी गेला
- दीपक काठी आणण्यासाठी लांब गेला.
- विशेषण, क्रियाविशेषण
- शब्दयोगी अव्यय, क्रियापद
- नाम, विशेषण
- यापैकी नाही
प्रश्न :पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. विवेक हा चांगला मुलगा आहे.
- विशेषण
- क्रियापद
- सर्वनाम
- नाम
प्रश्न :अविकारी शब्दांनाच ……. असे म्हणतात?
- अव्यय
- सव्यय
- नाम
- यापैकी नाही
प्रश्न :शब्दांच्या जातीतील खालीलपैकी अविकारी जात ओळखा?
- शब्दयोगी अव्यय
- नाम
- सर्वनाम
- विशेषण
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा