Success story 03 : जाऊन सांगा त्या नशिबाला, हार मानायचे सवय नाही आम्हाला | Motivational story

Motivational story – आज आपण ज्या व्यक्तीची कहाणी पाहणार आहोत त्याचे नाव आहे आदित्य दाभाडे. 

  • नाव : आदित्य दाभाडे (Maharashtra police)
  • निवड : नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई
  • इंस्टाग्राम अकाउंट : येथे क्लिक करा
  • यूट्यूब अकाउंट :  येथे क्लिक करा

आदित्यचे बालपण – Motivational story

आदित्य यांचे चार भावंडे आणि आई-वडील असे कुटुंब होते. आदित्य जेव्हा लहान होते तेव्हा इयत्ता दुसरी मध्ये शिकत असताना त्याची आई गेली. याच गोष्टीच्या चिंतेत असल्यामुळे वडील दारूच्या आहारी गेले. चारही भावंडे अनाथ झाली, नातेवाईकांनी मदत करण्यास नकार दिला. घरची आर्थिक परिस्थिती खराब झाली. त्यामुळे चारही भावंडांची जबाबदारी आदित्य यांच्यावर पडली. दिवसा शिक्षण संध्याकाळी हॉटेलमध्ये काम आणि इतर वेळी घरकाम करून आदित्य यांनी ही जबाबदारी उचलली. इतके करूनही कित्येकदा त्यांना रात्री उपाशी झोपावे लागत असे. 

Aditya’s childhood

Aditya had a family consisting of his four siblings and parents. Aditya’s mother passed away when he was still studying in second standard. Worrying about this, the father became addicted to alcohol. All four siblings became orphans, relatives refused to help. The financial condition of the house worsened. So the responsibility of all the four siblings fell on Aditya. Aditya took up this responsibility by studying during the day, working in a hotel in the evening and doing housework at other times. Even after doing this, sometimes they had to sleep hungry at night.

आधार (Motivational story)

कुटुंबाचे होत असलेले हाल पाहून त्यांची आजी मदतीला आली. त्यांच्या यशामध्ये आजीचा देखील खूप मोठा वाटा आहे. आईच्या निधनाने वडील नशेच्या आहारी गेले यानंतर चारी भावंडांच्या खूप हाल होत. तरी अशामध्ये त्यांचे आजी त्यांना मदतीला आले. रस्त्यावर फळे विकून, शेतात काम करून आणि घरातील सर्व कामे पाहून आजीनी त्यांची घर कामातच नव्हे तर आर्थिक ही मदत केली. याच आजीमुळे आदित्य यांचे बालपणीचे शिक्षण व्यवस्थित पूर्ण होऊ शकले. 

support

Seeing the plight of the family, his grandmother came to his aid. And grandmother has also played a huge role in their success. After the death of their mother, their father was devastated, but their grandmother came to their aid. By selling fruits on the street and working in the fields and looking after all the household chores, Adi helped them not only in household work but also financially. Aditya was able to complete his childhood education properly because of this grandmother.

हेही वाचा>>>>Inspirational stories of success | राजेश गायकवाड : पोलीस भरतीची प्रेरणादायी कहाणी-02

Motivational story – आर्मीचे वेड

दहावीपर्यंतचे शिक्षण झाले आता अकरावी बारावी करिता त्यांच्या गावामध्ये अशी सोय नव्हती. म्हणूनच अकरावी बारावी करता ते त्यांच्या मामाच्या गावी शिक्षणाकरिता गेले. तिथे अकरावी बारावीच्या शिक्षण घेत असताना त्यांना अनेक विद्यार्थी मैदानावर व्यायाम आणि धावण्याचा सराव करताना दिसले. अधिक चौकशी केली असता ते आर्मी भरती ची तयारी करत असल्याचे समजले. त्याचमुळे आदित्य यांनाही हळूहळू आर्मी भरतीचे वेड लागले. आणि आदित्य यांनी लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला. एकदा नाही दोनदा नव्हे सलग पाच वेळा अपयश आल्यानंतर त्यांना शेवटी आसाम रायफल या परीक्षेत यश मिळालेच. आता ट्रेनिंगला जाण्याचा दिवस उजाडला परंतु काळाने घात केला आणि त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांना ट्रेनिंगला जाणे शक्य झाले नाही. 

Army obsession

After studying up to 10th standard, there was no such facility in his village for 11th and 12th standard. That’s why he went to his maternal uncle’s village for his education in 11th and 12th standard. While studying in class 11th and 12th there, he saw many students exercising and running on the field. On further investigation, it was found that he was preparing for army recruitment. Due to this, Aditya also gradually became obsessed with army recruitment. And Aditya decided to join the army. After failing not once, not twice, but five consecutive times, he finally succeeded in the Assam Rifles exam. Now the day dawned for him to go for training but time intervened and his father passed away. So they could not go for training.

पोलीस भारताकडे वाटचाल | Motivational story

आर्मीचा मार्ग आता बंद झाला होता. घरखर्च आणि शिक्षण याकरिता जवळ पैसे नव्हते.  बेरोजगार अवस्थेत पुढील परीक्षेची तयारी कशी करणार म्हणून त्यांनी नाईलाजास्तव नाशिकमध्ये असलेल्या एका ठिकाणी सेक्युरिटी गार्डची नोकरी स्वीकारली. नोकरी करत असताना कुठेतरी आर्मीचे वेड मध्ये मध्ये डोके वर काढत होते त्याच्यामुळे त्यांना समाजात मान असलेली नोकरी हवी होती. त्याचमुळे त्यांनी सेक्युरिटी गार्डची नोकरी करत असतानाच अभ्यास चालू ठेवला. जवळ असलेल्या आर्मी भरती अकॅडमी मध्ये चौकशी केली असता पोलीस भरतीची संधी त्यांना दिसली. नोकरी सांभाळत त्यांनी पुन्हा मागील सराव चालू करून आता पोलीस भरतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. 

Police move to India

The Army’s path was now closed and there was almost no money left to spend. In the state of being unemployed, he unexpectedly accepted a job as a security guard at a place in Nashik to prepare for the next exam. Somewhere while working, the army craze started to rise and he wanted a respectable job in the society. That is why he continued his studies while working as a security guard. When he inquired at the nearby Army Recruitment Academy, he saw an opportunity for police recruitment. While maintaining the job, he resumed his previous practice and now started moving towards police recruitment.

नाशिक ग्रामीण पोलीस मध्ये निवड – Motivational story

पोलीस भरतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर पुणे सिटी करिता त्यांनी अर्ज केला परीक्षा दिली परंतु तिथेही त्यांना अपयश आले. पुणे जिल्ह्यात वेटिंग लिस्ट मध्ये त्यांचे नाव होते तरी त्यांनी नाशिक पोलीस भरती करिता पुन्हा प्रयत्न केला. आता यावेळी पोलीस भरतीची तयारी, मैदानी चाचणीचा सराव, अभ्यास यासोबतच त्यांना मानसिक संतुलन ठेवणे ही खूप गरजेचे होते. अखेर आता अथक परिश्रमानंतर त्यांचा संघर्ष संपला आणि त्यांची नाशिक पोलीस दलात निवड झाली.

Selection in Nashik Rural Police

After the journey of police recruitment started, he applied for Pune City and took the exam but failed there as well. Although his name was in the waiting list from Pune, he tried again for Nashik police recruitment. Now at this time it was very important for them to keep mental balance along with the preparation of police recruitment field test practice study. Finally, after the localisation, his struggle ended and he was selected in the Nashik Police Force.