Maharashtra Police Structure and Posts – या लेखामध्ये आपण महाराष्ट्रातील पोलीस रचना व पदे याविषयी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे हा लेख अभ्यास केल्यानंतर तुम्हाला या घटकातील एकही गुण जाणार नाही याची 100 % खात्री आहे.
महाराष्ट्र पोलीस स्थापना आणि महत्त्वाचे दिवस – Maharashtra Police Structure and Posts – 25 Marks
- स्थापना दिवस:
- महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 रोजी झाली.
- त्या दिवशी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला.
- हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस किंवा पोलीस रेझिंग डे म्हणून ओळखला जातो.
- पोलीस स्मृती दिन:
- 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो.
पोलीस आयुक्तालये
- आयुक्तालयांची संख्या:
- महाराष्ट्रात एकूण 12 पोलीस आयुक्तालये आहेत.
- मीरा-भाईंदर वसई-विरार हे 12 वे पोलीस आयुक्तालय आहे.
- विशेष महत्त्व:
- ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक आयुक्तालये आहेत:
- ठाणे शहर
- नवी मुंबई
- मीरा-भाईंदर वसई-विरार
- ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक आयुक्तालये आहेत:
- आयुक्तालय नसलेले शहर:
- धाराशिव येथे पोलीस आयुक्तालय नाही.
पोलीस दलाचे प्रतीक आणि ब्रीदवाक्य : Maharashtra Police Structure and Posts – 25 Marks
- ध्वज:
- महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंड्याचा रंग गडद निळा आहे.
- झेंड्यावर पांढऱ्या अक्षरात ब्रीदवाक्य आणि हाताचा पंजा दर्शविला आहे.
- हाताचा पंजा:
- ध्वजावरील हाताचा हसलेला पंजा “अभय निदर्शक” आहे.
- ब्रीदवाक्य:
- “सदरक्षणाय खलनिग्रहणाय”
पोलीस मुख्यालय आणि मासिक
- मुख्यालय:
- महाराष्ट्र राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे.
- तिथून पोलीस महासंचालक कामकाज पाहतात.
- मासिक:
- “दक्षता” हे दर महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक आहे.
क्र. | विषय | माहिती |
1 | ध्वज | महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंड्याचा रंग गडद निळा आहे. झेंड्यावर पांढऱ्या अक्षरात ब्रीदवाक्य आणि हाताचा पंजा दर्शविला आहे |
2 | हाताचा पंजा | ध्वजावरील हाताचा हसलेला पंजा “अभय निदर्शक” आहे |
3 | ब्रीदवाक्य | सदरक्षणाय खलनिग्रहणाय |
4 | मुख्यालय | महाराष्ट्र राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे. तिथून पोलीस महासंचालक कामकाज पाहतात |
5 | मासिक | दक्षता |
हेही वाचा >>>>नामाचा लिंग विचार | Ling vachan in marathi
Maharashtra Police Structure and Posts – 25 Marks | महत्वाचे मुद्दे
- दिनांक 2 जानेवारी 1961 रोजी पोलीस दलाची स्थापना झाली. त्यादिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज प्रदान केला. त्या दिवसापासून दोन जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस किंवा पोलीस रेझिंग डे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो.
- महाराष्ट्र मध्ये एकूण बारा पोलीस आयुक्तालय आहेत त्यातील मीरा-भाईंदर वसई विरार हे बारावी पोलीस आयुक्तालय आहे. धाराशिव या शहरांमध्ये पोलीस आयुक्तालय नाही.
- महाराष्ट्र मध्ये एकूण असलेल्या आयुक्तालयांपैकी सर्वात जास्त आयुक्तालय ही ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. यामध्ये ठाणे शहर, नवी मुंबई, मीरा भाईंदर व वसई विरार ही आयुक्तालय येतात.
- दक्षता हे दर महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक आहे.
- महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंड्याचा रंग गडद निळा असून त्याच्यामध्ये पांढऱ्या अक्षरांमध्ये पोलीस खात्याचे ब्रीदवाक्य लिहून हाताचा पंजा दाखविला आहे.
- महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजावरती हसलेला हाताचा पंजा हा काय दर्शवतो – अभय निदर्शक
- दिनांक 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची पुनर्रचना झाली आणि स्थापना झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस यांना ध्वज प्रदान केला होता.
- महाराष्ट्र पोलीस दलाचा पोलीस स्मृतीदिन हा 21 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो तर स्थापना दिवस किंवा रेझिंग डे हा 2 जानेवारी रोजी साजरा केला जातो.
- महाराष्ट्र राज्याचे पोलीस मुख्यालय हे मुंबई येथे असून तिथूनच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक काम करत असतात.
- पोलीस खात्याचे ब्रीदवाक्य काय आहे – सदरक्षणाय खलनिग्रहणाय
महत्वाचे मुद्दे – Maharashtra Police Structure and Posts – 25 Marks
- पोलीस कॉन्स्टेबल या पदावर असलेल्या व्यक्तीची हेड कॉन्स्टेबल या पदावर ती पदोन्नती दहा वर्षांनी होते. 2022 अगोदर पोलीस कॉन्स्टेबल या पदावरुन पोलीस नाईक हे पद मिळत असे परंतु त्यानंतर पोलीस नाईक हे पद रद्द झाल्यानंतर आता पोलीस कॉन्स्टेबल या पदावरून डायरेक्ट हेड कॉन्स्टेबल हे पद पोलीस खात्यात दहा वर्षे झाल्यानंतर मिळते.
- पोलीस खात्यामध्ये पोलीस निरीक्षक पद आहे जे फक्त आणि फक्त पदोन्नतीनेच मिळू शकते. पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI या पदावरती भरती झाल्यानंतर पदोन्नतीने पोलीस निरीक्षक ही पदवी मिळते. हे एकमेव पद आहे जे पदोन्नतीने मिळते बाकी पदेही भरली जातात.
- महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस नाईक पद अस्तित्वातच नाही. पोलीस नाईक हे पण 2022 पूर्वी अस्तित्वात होते परंतु आता सध्या 2022 च्या शासन निर्णयानुसार पोलीस नाईक हे पद रद्द करण्यात आलेले आहे.
- पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई हे सर्वात कनिष्ठ तर अप्पर पोलीस महासंचालक हे सर्वोच्च पद आहे.
- साधारणतः पाच ते सहा जिल्ह्यांकरता मिळून एक परिक्षेत्र असते. त्या एका परिक्षेत्रावरती विशेष पोलीस महानिरीक्षक ही प्रमुख अधिकारी म्हणून काम करतात.
- पोलीस खात्याच्या वर्दीमध्ये खांद्यावरती तीन स्टार व म.पो.से. असे लिहिले असलेले पद – पोलीस उपाधीक्षक. पोलीस उपाधीक्षक हे जर ग्रामीण भागात असतील तर त्यांना डीवायएसपी तर शहरी भागात असतील तर त्यांना एसीपी असे म्हणतात.
- पोलीस उपनिरीक्षक व निरीक्षक या दोन्ही पदांकरिता लाल नळी पीत व मपसे असे लिहिलेले असते तर पोलीस उपनिरीक्षक या पदास दोन स्टार तर पोलीस निरीक्षक या पदास तीन स्टार दिलेल्या असतात.
- महाराष्ट्र पोलीस दलातील पंचकोनी तारा हे पारंपारिक चिन्ह आहे.
- जिल्हास्तरावरती पोलीस खात्याचा प्रमुख पोलीस अधीक्षक असतो.
- नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्याकरिता महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सी 60 बल बनविण्यात आले आहे. गडचिरोली सारख्या विभागामध्ये नक्षलवादी यांचा मुकाबला करण्याकरिता तेथील स्थानिक आदिवासींना पोलीस दलामध्ये भरती करून घेऊन त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन साठ लोकांची एक टीम करण्यात आली त्यास सी 60 असे नाव देण्यात आले.
- महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आहे. नाशिक येथील त्रंबक रोड येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे.
- 26/11 च्या हल्ल्यानंतर अशा दहशतवादी हल्ल्यांना रोखण्याकरिता फोर्स वन यंत्रणा स्थापन करण्यात आली. फोर्स वनचे मुख्यालय हे गोरेगाव येथे असून त्यात 200 हून अधिक जवान या पथकामध्ये कार्यरत आहेत.
- नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद येथे आहे. तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे नॅशनल पोलीस अकॅडमी आहे.
- एम आय ए ही एजन्सी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्र इंटेलिजन्स एजन्सी (MIA) सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली गोपनीय माहिती गोळा करण्याचे काम करते हेचे मुख्यालय पुणे येथे आहे.
- पोलीस संशोधन केंद्र ही संस्था महाराष्ट्रातल्या पुणे शहरामध्ये आहे. पोलीस संशोधन केंद्र (CPR) ही संस्था पोलीस खात्यासंदर्भातील विविध प्रकारचे संशोधन करत असते. ही संस्था पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय याच्या जवळ आहे.
अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा