Inspirational stories of success – हर्षदा कुंडलिक कांदळकर च्या प्रेरणादायी यशाविषयी हा लेख आहे हर्षदा जी एक मेंढपाळ कुटुंबातून आलेली मुलगी जी पहिल्याच प्रयत्नात मुंबई पोलीस दलामध्ये नियुक्त होते. तिच्या शिक्षणाचा प्रवास संघर्ष आणि विशेषतः त्याच्या आजीने केलेली तिला मदत पोलीस भरती होण्याकरता लाखमोलाची ठरते. हर्षदाच्या अशा मागे तिच्या कुटुंबाचे आजीचे आणि मावशीचे मोठे योगदान आहे.
बायोग्राफी – Inspirational stories of success
संपूर्ण नाव : हर्षदा कुंडलिक कांदळकर
जन्म:
- गाव: दोडी
- तालुका: सिन्नर
- जिल्हा: नाशिक
कुटुंबाचे मूळ गाव:
- गाव: दिघे
- तालुका: संगमनेर
- जिल्हा: अहमदनगर
Biography
- Full Name : Harshada Kundlik Kandalkar
- Born:
- Village: Dodi
- Taluka: Sinnar
- District: Nashik
- Native Village of Family:
- Village: Dighe
- Taluka: Sangamner
- District: Ahmednagar
मेंढपाळीचा व्यवसाय (Inspirational stories of success)
हर्षदाचा कुटुंबीयांचा मेंढी पालनाचा पारंपारिक व्यवसाय असल्याकारणाने त्यांना नेहमीच एका गावाकडून दुसरीकडे स्थलांतर करत राहावे लागत असे. त्याचमुळे हर्षदा सात वर्षाची असतानाच तिला तिच्या कुटुंबीयांनी तिच्या आजी कडे ठेवले आणि आजीनेही तिच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली. लहानपणापासूनच हुशार असलेल्या हर्षदाने आजीच्या कष्टांची जाणीव ठेवून अभ्यासात देखील तितकीच मेहनत घेतली. अभ्यासासोबतच खेळामध्ये ही ती तेवढीच सक्रिय होती. आधीच्या मदतीने बारावीपर्यंत शिक्षण कसेबसे पूर्ण झाले.
The business of shepherding
As Harshad’s family’s traditional occupation was sheep farming, they had to constantly move from one village to another. Because of this, when Harshada was seven years old, her family placed her with her grandmother and the grandmother took full responsibility for her education. Harshada, who was smart from childhood, worked equally hard in his studies keeping in mind the hardships of his grandmother. Along with studies, she was equally active in sports. With the help of the former, the education up to class 12 was somehow completed.
हेही वाचा>>>>सलग तीनदा अपयश तरीही सोडली नाही जिद्द | Success stories in marathi
Inspirational stories of success – शिक्षण आणि करिअरची दिशा
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर नातेवाईकांनी तिच्या लग्नाची चर्चा जरी सुरू केली तरी आजीने मात्र हर्षदा ला चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला हर्षदाने सुद्धा साथ दिली. खेळामध्ये शाळेत असल्यापासून अग्रेसर असलेल्या हर्षदाने डिफेन्स मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कला शाखेतून पदवीच्या पहिल्या वर्षाकरिता तिने लोणी येथील एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला सोबतच सिन्नर मधील एका पोलीस अकॅडमीतही भरतीची तयारी चालू केली.
Education and career direction
Although her relatives started discussing her marriage after passing 12th, her grandmother decided to give Harshada a good education and make her stand on her own feet. Harshad also supported this decision. Harshad, who excelled in sports since his school days, decided to move into defence. She took admission in a college in Loni for the first year of graduation in Arts and also started preparations for recruitment in a police academy in Sinnar.
अपयश आणि यश | Inspirational stories of success
2022 मध्ये झालेल्या आर्मी भरतीत उंची मध्ये कमी भरल्याने तिला अपात्र करण्यात आले. त्यानंतर तिने पोलीस भरतीसाठी तयारी करून पहिल्या प्रयत्नामध्ये मैदानी चाचणीत 35 तर लेखी परीक्षेत 73 गुण मिळवून मुंबई पोलीस दलात भरती झाली.
आज हर्षदा ना जे काही यश मिळवले त्यामागे तिची आजी आणि मावशी यांचे खूप सहकार्य असल्याचे हर्षदा म्हणते. त्यांच्या आशीर्वादामुळेच आज हे स्वप्न ती पाहू शकली. खेडे पाड्यातील तरुण-तरुणींसाठी हर्षदाचा हा प्रवास एक मोठा प्रेरणादायी उदाहरण ठरू शकते. तिला तिच्या पुढील भविष्याकरिता खूप खूप शुभेच्छा.
Failure and success
She was disqualified for the army recruitment in 2022 due to short height. After that, she prepared for police recruitment and got recruited in Mumbai Police Force by scoring 35 marks in field test and 73 marks in written test.
Harshada says that the success Harshada has achieved today is due to the support of her grandmother and aunt. It is because of their blessings that she could see this dream today. This journey of Harshada can be a great inspirational example for the youth of the village. We wish her all the best for her future.
अशाच प्रकारच्या मोटिवेशनल सक्सेस स्टोरी करिता आमच्या संकेतस्थळाला भेट द्या तसेच आमच्या सर्व सोशल अकाउंटला फॉलो करा आणि आमच्याशी कनेक्टेड रहा. तुम्ही पोलीस भरती किंवा आर्मी भरतीची तयारी करत असाल तर त्या संदर्भात नवीन नवीन माहिती तसेच ऑनलाईन सराव टेस्ट आपण आपल्या संकेतस्थळावर दिलेले आहेत. या सर्व मोफत असल्यामुळे नक्कीच समाजाचे सर्व विद्यार्थ्यांकरिता याचा लाभ उठवणे शक्य होईल. रोज एक सराव पेपर सोडून नक्कीच तुम्ही 90 दिवसांमध्ये पोलीस किंवा आर्मी भरती करता परिपूर्ण होऊ शकतात. तुम्ही सुद्धा प्रयत्न करत राहा तुम्हालाही आज ना उद्या सरकारी नोकर भरती मध्ये यश मिळेलच. माघार घेऊ नका किंवा खचून जाऊ नका प्रामाणिकपणे प्रयत्न आणि सातत्य ठेवल्यास नक्कीच यश मिळते.
For similar motivational success stories visit our website and follow all our social accounts and stay connected with us. If you are preparing for police recruitment or army recruitment, we have provided new information and online practice tests in this regard on our website. Since all these are free, surely it will be possible for all the students of the society to benefit from it. Sure you can perfect police or army recruitment in 90 days by leaving one practice paper daily. You also keep trying and you too will get success in govt recruitment today or tomorrow. Don’t give up or get tired. Sincere effort and persistence will surely lead to success.
अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा