Inspirational stories of success | राजेश गायकवाड : पोलीस भरतीची प्रेरणादायी कहाणी-02

Inspirational stories of success – म्हणतात ना “किसी चीज को अगर शिद्दत से चाहो, तो पुरी कायनात उसे मिलाने की कोशिश करती है”. त्याचप्रमाणे लहानपणापासूनच वर्दीचे स्वप्न उराशी बाळगलेला राजेश अखेर 9 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झालाच. 

बायोग्राफी :

  • नाव : राजेश गायकवाड
  • गाव : पांगरी
  • जिल्हा : सातारा
  • शिक्षण : बीएससी
  • पद : सिंधुदुर्ग पोलीस
  • इंस्टाग्राम अकॉउंट : येथे क्लिककरा 
  • यूट्यूब अकॉउंट :  येथे क्लिक करा 

राजेश चे बालपण – Inspirational stories of success

आजची आपण कहाणी पाहणार आहोत त्याचे नाव आहे राजेश. सातारा जिल्ह्यामधील पांगरी गावात राहणारा राजेश जिद्दीने चिकटी अभ्यासात हुशार आणि बालपणापासूनच देश सेवेची तीव्र इच्छा असणारा व्यक्ती होता. अभ्यासात हुशार असल्यामुळेच दहावीनंतर राजेशने बारावी करिता घेतलेले शिक्षण हे विज्ञान शाखेतून घेतले आणि घरच्यांच्या आग्रहास्तव बारावीनंतर बीएससी मध्ये प्रवेश केला. यासोबतच त्यांनी लष्करामध्ये भरती करिता प्रयत्न चालू ठेवले. 

Rajesh’s childhood

Today we are going to see the story, his name is Rajesh. Rajesh, a resident of Pangri village in Satara district, was a stubbornly smart, studious person with a strong desire for country since childhood. Being smart in studies, after class 10, Rajesh took his education for class 12 from science department and after insisting by his family, he entered B.Sc after class 12. Along with this, he continued his efforts to recruit in the Army.

लष्कर भरती करिता प्रयत्न (Inspirational stories of success)

2016 मध्ये पहिल्यांदा त्यांनी लष्करामधील भरतीसाठी अर्ज केला परंतु वैद्यकीय चाचणीमध्ये अपयश आले परंतु त्यानंतर 2017 करीता पुन्हा एकदा लष्कर भरतीचा अर्ज केला परंतु तेव्हाही त्यांना धावण्याच्या चाचणीमध्ये पुन्हा एकदा अपयश आले. त्यानंतर लष्कर भरतीचा प्रयत्न सोडून 2018 मध्ये SSC GD करिता प्रयत्न करून पाहिला त्यातही फक्त 0.25 गुणांनी मेरिट यादीतून नाव हुकले. 

Efforts for army recruitment

He first applied for Army recruitment in 2016 but failed the medical test but then again applied for Army recruitment in 2017 but again failed the running test. After that he gave up his Army recruitment attempt and tried for SSC GD in 2018 but missed the merit list by just 0.25 marks.

हेही वाचा>>>>एक जिद्दी प्रवास : कोमल वरेची यशोगाथा | Maharashtra police success story komal vare

बीएससी पदवी आणि नोकरी | Inspirational stories of success

आणि आता 2019 उजाडले बीएससी ची पदवी हाती आली आणि इतरांप्रमाणेच राजेश कंपनीमध्ये नोकरीला लागला. लष्करात भरती होण्याचा मार्ग आता बंद झाला होता परंतु राजेशला यशस्वी होण्याची इच्छा काही शांत बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी पोलीस दलामध्ये भरती होण्याचा निर्णय घेतला. बीएससी शिक्षणाच्या आधारावर मिळालेल्या नोकरीसोबत पोलीस भरतीसाठी तयारी राजेश करत असत. त्यानंतर पालघर पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षा छान गेली परंतु मैदानी चाचणीमध्ये असलेल्या शंभर मीटर या इव्हेंटमध्ये धावताना लिगामेंटचा त्रास झाला. 

BSc Degree and Jobs

And now 2019 dawned, B.Sc degree came in hand and like others got a job in Rajesh company, the way to join the army was closed now but Rajesh’s desire to succeed was not letting any rest so he decided to join the Police force. Rajesh is preparing for police recruitment with the job he got on the basis of B.Sc education, after which he passed the written exam in Palghar police recruitment but suffered a ligament problem while running the 100 meter event in the field test.

Inspirational stories of success – कुटुंब व मित्र यांचा आधार

या एका पाठोपाठ एक आलेल्या मोठमोठ्या अपयशानंतर मित्र आणि कुटुंबांनी आधार दिला. त्यानंतर झालेल्या दुखापती वर उपचार करून हार न मानता त्यांनी पुन्हा तयारीला सुरुवात केली. त्यानंतर झालेल्या 2023 मधील सिंधुदुर्ग पोलीस दलामध्ये त्याची निवड झाली आणि राजेशला आणि त्यांच्या मित्र परिवाराला तसेच कुटुंबीयांना खूप आनंद झाला. 

Support of family and friends

After this series of major setbacks, friends and family provided support. After that, he started training again without treating the injuries. Then he got selected in Sindhudurg Police Force in 2023 and Rajesh and his friends and family were very happy.

प्रेरणा आणि मार्गदर्शन – Inspirational stories of success

राजेश च्या या कहाणीतून आपण ही प्रेरणा घेऊ शकतो की एखाद्या व्यक्तीमध्ये जर हार न मानण्याची जिद्द असेल आणि स्वप्न सत्यात उतरण्याची ताकद असेल तर तो व्यक्ती एक ना एक दिवस नक्कीच स्वप्न सत्यामध्ये उतरू शकतो. 

Inspiration and guidance

We can take inspiration from this story of Rajesh that if a person has the determination not to give up and has the strength to make his dream come true, then that person can definitely make his dream come true one day.

यशाच्या रहस्य (Inspirational stories of success)

असेच पोलीस भरतीमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर त्यासाठी गरज आहे ती उत्तम मार्गदर्शनाची आणि सराव परीक्षा सोडविण्याची. तर मग आजच ड्रीम वरती या संकेतस्थळाला भेट द्या आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला डेली ऑनलाइन टेस्ट आणि वन लाइनर नोट्स यांच्या साह्याने तुमच्या स्वप्न आणि तुमची आत्ताची परिस्थिती याच्या मधील अंतर कमी होण्यामध्ये आमची मदत होईल.

जिद्द ठेवा, मेहनत करत रहा आणि मोठी स्वप्न पाहत रहा. यश तुमचेच आहे.

Secrets of success

Similarly, if you want to succeed in police recruitment, you need good guidance and practice exams. So visit the Dream Surat website today and join your social media accounts to help us bridge the gap between your dreams and your current situation with daily online tests and one-liner notes. Be persistent, keep working hard and dream big, success is yours.

राजेश गायकवाड यांचे इंस्टाग्राम अकॉउंट ला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा. यूट्यूब अकॉउंट ला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.