३५००० नसल्याने करावा लागला क्लास बंद , आज करोडो चे मलिक | Vitthal kangane

Vitthal kangane – विठ्ठल कांगणे यांच्या जीवनातील संघर्ष आणि यशाची कथा आजच्या या लेखात आपण दिलेली आहे. त्यांच्या जीवनात त्यांना किती अडचणी आल्या आणि त्यांच्या मेहनतीमुळे आज ते कशा पद्धतीने यशस्वी झाले यावर प्रकाश टाकलेला आहे. लेखामध्ये त्यांचे बालपण शिक्षणात आलेल्या अडचणी शिक्षक होण्याचा निर्णय लॉकडाऊन मध्ये आलेले अडचणी आणि युट्युबमुळे त्यांना मिळालेले यश या सर्व प्रवासाची माहिती दिली आहे.

संघर्षाची सुरुवात – Vitthal kangane

स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विठ्ठल कांगणे हे नाव माहित नाही असे होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अग्रस्थानी असलेले विठ्ठल कांगणे यांचा जीवन प्रवास एवढा सहज नाही. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. लोकांच्या नजरेत येण्याकरिता त्यांना संघर्षमय जीवनाचा सामना करावा लागला होता सोशल मीडियावर आज विठ्ठल कांगणे हे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध जरी असले तरी ही लोकप्रियता एका रात्रीत मिळालेली नाही. कष्ट धैर्य संयम आणि वेदना यांनी भरलेल्या प्रवासामुळेच आज ते यशाच्या शिखरावर पोहोचलेले आहेत. विठ्ठल सरांनी कधीही हार मानली नाही आणि आपल्या ध्येयाची पाठ सोडली नाही. 

बालपण (Vitthal kangane)

परभणी जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात विठ्ठल कांगणे यांचा जन्म झाला. आईचं लहानपणीच निधन झालं त्यामुळे त्यांना सावत्र आईसोबत राहावे लागत असे. सावत्र आईच्या राग दुर्लक्ष याचा सामना करत त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांना शाळेत जात असताना कधी डबांना मिळणे ही त्यांची रोजची समस्या होती परंतु त्यांचे मित्र त्यांच्यासाठी नेहमी जेवण आणायचे याच कठीण परिस्थितीमध्ये त्यांच्या मनात संघर्ष करण्याची ठाम जिद्द निर्माण झाली. 

हेही वाचा>>>>मेंढपाळ ते मुंबई पोलीस प्रवास | Inspirational stories of success

Vitthal kangane – शैक्षणिक प्रवास आणि अडचणी 

शालेय शिक्षण सुरू असताना त्यांना अनेक आर्थिक अडचणी आल्या. उच्च शिक्षण घेण्याच्या वेळेत त्यांना पाईप्रवास करत कॉलेजला जाणे तसेच व या पुस्तकांसाठी पैसे नसणे अशी वेळ आली होती. गणिताच्या शिक्षकांवर असलेले प्रेम आणि आदर्श यामुळे त्यांनी शिक्षक बनण्याचा निर्णय घेतला. बीडचे शिक्षण सुरू असताना वाईट संगतीमुळे अभ्यासाकडे थोडीफार दुर्लक्ष झाले त्याचाच परिणाम म्हणून डीएड सीईटी परीक्षेत त्यांना अपयश आले परंतु ते तिथे थांबले नाहीत.  एकदा असा प्रसंग आला की त्यांना परीक्षेची फी भरण्याकरताही पैसे नव्हते त्यामुळे त्यांनी एका क्लासमध्ये काम केले आणि परीक्षेची फी भरली आणि परिणामी ते फॉरेस्ट गार्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. 

शिक्षक होण्याचा निर्णय | Vitthal kangane

फॉरेस्ट गार्ड ही सरकारी नोकरी मिळूनही विठ्ठल कांगणे यांचे मन मात्र शिक्षण बनण्याचेच होते. फॉरेस्ट कार्ड म्हणून काही वर्ष काम केल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीला राजीनामा दिला आणि आपली शिक्षक होण्याची आवड पुन्हा जोपासले. शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी अनुभव घेऊन दोन वर्षानंतर स्वतःची अकॅडमी सुरू केली. स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी सुरू करणे हा त्यांचा खूप महत्त्वपूर्ण निर्णय होता कारण यामुळे त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला एक नवा टप्पा मिळाला होता. 

लॉकडाऊन मधील आव्हान – Vitthal kangane

शिक्षक होण्याचा ठाम निर्णय जरी घेतला असला तरी विठ्ठल कांगणे यांच्या शिकवणीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये फक्त सहाच विद्यार्थी होते. परंतु काही महिन्यांमध्येच विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. आणि संकट आले कोरोनाचे. कोरोनाच्या संकटामुळे त्यांना क्लास बंद करावा लागला सोबतच त्यांना आर्थिक संकटांचा सामना देखील करावा लागला. यातच त्यांच्या वडिलांचे हे निधन झाले. आणि एक वेळ अशी आली की क्लासचा भाडं 35000 भरण्याकरिता त्यांना स्वतःच सोनं विकावं लागलं होतं. परंतु त्यानंतर आज एक वेळ अशी ही आली होती की त्यांच्या शंभर रुपयांच्या बॅचने त्यांना एक कोटी रुपये कमवून दिले. 

Challenges in Lockdown – Vitthal Kangane

Although the firm decision to become a teacher was taken, there were only six students in Vitthal Kangane’s teaching in the beginning. But within a few months the number of students started increasing. And the crisis came Corona. Due to the crisis of Corona, they had to close the class and they also had to face financial problems. His father died in this. And there was a time when he had to sell gold himself to pay the class fee of 35000. But then today there was a time when his hundred rupees batch earned him one crore rupees.

युट्युब वर यशाची कहाणी (Vitthal kangane)

लॉकडाऊनमुळे आलेले संकटाला संधीमध्ये रूपांतर करीत त्यांनी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा वापर सुरू केला आणि विद्यार्थ्यांना youtube वर शिकवणी सुरू केली. यातही त्यांना ऑफलाईन अकॅडमी प्रमाणे सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु त्यांचा एक व्हिडिओ इतका प्रचंड व्हायरल झाला की त्यांच्या आयुष्यात त्या व्हिडिओने क्रांती घडवली. आणि त्यांचे सबस्क्राईबरची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. 

Success Story on YouTube (Vitthal kangane)

Turning the crisis caused by the lockdown into an opportunity, he started using the online education system and started teaching students on YouTube. Even in this they did not get much response in the beginning like offline academy. But one of his videos went viral so much that it revolutionized his life. And their number of subscribers is increasing day by day.

Vitthal kangane – आजचा यशस्वी प्रवास 

लाखो विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान आज विठ्ठल कांगणे बनले आहेत त्यांच्या यशाचा प्रवास हा लहान संघर्षातून जरी सुरू झाला असला तरी आज स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये त्यांचे नाव खूप मोठे आहे. आपल्या अशा नेत्यांनी खूप जणांना प्रेरणा दिली तसेच त्यांच्या व्हिडिओ ना सुद्धा खूप प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी youtube वर व्हिडिओ टाकल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये लाखोमध्ये घेऊन येतात. त्यांचा प्रवास हे दाखवतो की कष्ट आणि चिकाटीने जर प्रयत्न सुरू ठेवले तर कोणतेही अडचणीवर मात करता येते. 

Vitthal kangane – Successful journey today

Today Vitthal Kangane has become an inspiration to millions of students, his success journey started with a small struggle, but today his name is very big in the field of competitive exams. Our leaders have inspired many people and their videos are also getting huge response. They bring in millions within minutes of uploading videos on YouTube. Their journey shows that with hard work and persistence, any obstacle can be overcome.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा