विशेषण (मराठी व्याकरण) | Visheshan mcq

विशेषण (मराठी व्याकरण ) सराव टेस्ट १० गुण

1 / 10

प्रश्न  : गुणविशेषण ओळखा? 

2 / 10

प्रश्न  : पर्यायांपैकी धातुसाधित विशेषण ओळखा?

3 / 10

प्रश्न  : विशेषणाचा प्रकार ओळखा : माझे घर पुण्यात आहे 

4 / 10

प्रश्न  : अधोरेखित शब्दाची जात ओळखा : हा चौपदरी रस्ता आहे.

5 / 10

प्रश्न  : खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा 

6 / 10

प्रश्न  : गटात न बसणारे वाक्य निवडा 

7 / 10

प्रश्न  : अधोरेखित शब्दाची जात सांगा : ‘वर-बाप’ 

8 / 10

प्रश्न : ‘मांढरदेवीच्या यात्रेला पुष्कळ लोक आले होते’ या वाक्यामधील आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान योग्य आहे? 

9 / 10

प्रश्न  : ‘द्विगुणित’ हा शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या पोट प्रकारांमधील आहे? 

10 / 10

प्रश्न  : विशेषणाचा प्रकार ओळखा : खालचा मजला 

Your score is

The average score is 62%

0%

Visheshan mcq – विशेषण या व्याकरणाच्या घटकाबद्दल हा लेख आहे. नामाबद्दल विशेष माहिती देणारे शब्द म्हणजे विशेषण होय. लेखात विशेषणाचे प्रकार आणि त्यांचे उपप्रकार स्पष्ट केले आहेत. या लेखामध्ये विशेषणाचे प्रकार, त्यांची उदाहरणे आणि त्यांचा उपयोग कसा करावा हे सांगितले आहे. काही प्रश्न उत्तरे देखील दिले आहेत . सोबतच १० गुणांची ऑनलाईन सराव टेस्ट दिली आहे.

विशेषणचे प्रकार – Visheshan mcq

विशेषण :

  • नामाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणजे विशेषण होय.
    उदा. रमेश प्रेमळ माणूस आहे
    (वरील उदाहरणात प्रेमळ हा शब्द रमेश या नावाचे विशेषण आहे)

विशेष्य : 

  • ज्या नामाविषयी विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामास विशेष म्हणतात.
    उदा. रस्त्याने क्रूर श्वापद फिरतात
    (विशेष्य : श्वापद, विशेषण : क्रूर)

विशेषणाचे मुख्य तीन प्रकार 

  1. गुणविशेषण 
  2. संख्या विशेषण 
  3. सर्वनामिक विशेषण 

संख्याविशेषणाचे प्रकार आणि इतर विशेषणे (Visheshan mcq)

संख्या विशेषणाचे पाच प्रकार 

  1. गणना वाचक 
  2. क्रमवाचक 
  3. आवृत्ती वाचक 
  4. पृथकत्व वाचक 
  5. अनिश्चित

गणना वाचक चे तीन प्रकार 

  1. पूर्णांक वाचक 
  2. अपूर्णांक वाचक 
  3. साकल्यवाचक 

गुणविशेषण : 

  • (गुण + विशेषण) गुणविशेषण म्हणजे ज्या विशेषणाद्वारे नामाचा गुण दाखवल्या जातो त्या विशेषणास गुण विशेषण असे म्हणतात.
    उदा. सुंदर कडू गोड

संख्याविशेषण : 

  • (संख्या + विशेषण) संख्याविशेषण म्हणजे ज्या विशेषणाद्वारे नामाची संख्या दाखवल्या जाते त्या विशेषणास संख्या विशेषण असे म्हणतात.
    उदा. अर्धा तास, पाच हजार रुपये

साकल्यवाचक :

  • हा संख्या विशेषणाचा उपप्रकार असून यामधून आहेत तितक्या वस्तूंपैकी सर्व असा बोध होतो.
    उदा. आम्ही चाऱ्ही भावंडे पुण्यातच राहतो.
    (वरील उदाहरणातून हा बोध होतो की एकूण चार भावंडे आहेत आणि ती चारही म्हणजे सर्वच पुण्यात राहतात)

सर्वनामिक विशेषण : 

  • जी सर्वनामे वाक्यामध्ये नामा ऐवजी विशेषणासारखी वापरली जातात त्यांना सर्वनामिक विशेषण म्हणतात.
    उदा. माझे घर, ती मुलगी, ती चिमणी

धातू साधित विशेषण : 

  • (धातू + साधित) अगोदर धातू म्हणजे काय ते समजून घेऊ.
    धातू : क्रियापदामधील मूळ शब्दास धातू म्हणतात.
    त्याच धातूंस प्रत्येय जोडून त्याचा विशेषण म्हणून वापर होतो तेव्हा त्यास धातू साधित विशेषण म्हणतात.
    उदा. पडकी भिंत, भुंकणारा कुत्रा

अव्यय साधित विशेषण : 

  • मूळच्या अव्यय पासून तयार झालेल्या विशेषनास अव्यय साधित विशेषण असे म्हणतात.
    उदा. मागची गल्ली, पुढचे दार, खालचा मजला

क्रमवाचक

  • ज्या विशेषणामधून वस्तूचा क्रम दाखविता येतो त्यास क्रमवाचक विशेषण असे म्हणतात.
    उदा. प्रथमा, द्वितीय, तृतीय

आवृत्ती वाचक : 

  • संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे ज्यावरून कळते त्यास आवृत्ती वाचक विशेषण म्हणतात.
    उदा. द्विगुणित, तिहेरी, चौपट, पाचपट

पृथकत्ववाचक : 

  • जी विशेषणे वेगवेगळा असा संबोध करून देतात त्यास पृथकत्व वाचक विशेषण असे म्हणतात.
    उदा. एकेक, दोन-दोन, तीन-तीन

नाम साधित विशेषण : 

  • एका नामाविषयी अधिक माहिती सांगण्याकरता दुसरा नामाचा जेव्हा वापर होतो तेव्हा त्यास नाम साधित विशेषण असे म्हणतात.
    उदा. पैठणी साडी, कोल्हापुरी चप्पल, सोलापुरी चादर, सातारी कंदीपेढे

अनिश्चित विशेषण : 

  • ज्या शब्दातून नामा विषयी विशेष माहिती तर कळते परंतु निश्चित बोध होत नाही त्यास अनिश्चित विशेषण असे म्हणतात.
    उदा. काही, सर्व, पुष्कळ

पूर्णांक वाचक : 

एक दोन तीन चार 

अपूर्णांक वाचक : 

पाव, चतकोर, अर्धा, पाऊन

हेही वाचा>>>>सर्वनाम | Sarvanam in marathi

Visheshan mcq – प्रश्न उत्तरे एक ते पाच 

प्रश्न 1 : खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा 

  1. निरोप 
  2. निस्तेज 
  3. निर्धारित 
  4. निराश 

प्रश्न 2 : विशेषणाचा प्रकार ओळखा : खालचा मजला 

  1. अव्ययसाधित  
  2. गणनावाचक 
  3. क्रमवाचक 
  4. आवृत्तीवाचक 

प्रश्न 3 : पर्यायांपैकी धातुसाधित विशेषण ओळखा?

  1. पडकी इमारत 
  2. छोटी इमारत 
  3. तिसरी इमारत 
  4. मागची इमारत

प्रश्न 4 : ‘द्विगुणित’ हा शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या पोट प्रकारांमधील आहे? 

  1. आवृत्तीवाचक 
  2. गुणविशेषण 
  3. सार्वनामिक 
  4. साकल्यवाचक 

प्रश्न 5 : विशेषणाचा प्रकार ओळखा : माझे घर पुण्यात आहे 

  1. सर्वनामिक विशेषण 
  2. गुणविशेषण 
  3. संख्या विशेषण 
  4. गणनावाचक विशेषण 

Answer questions one to five

Q 1 : Identify the non-adjective word from the following

  1. Farewell
  2. dull
  3. Determined
  4. Disappointed

Q 2 : Identify the type of adjective : downstairs

  1. Unexpected
  2. calculator
  3. sequencer
  4. Editor

Q 3 : Identify the metallic adjective from the options?

  1. Abandoned building
  2. small building
  3. Third building
  4. Back building

Q 4 : The word ‘duplicate’ belongs to which subtypes of numeral adjective?

  1. Editor
  2. adjective
  3. universal
  4. omniscient

Q 5 : Identify the type of adjective : My house is in Pune

  1. Pronominal adjectives
  2. adjective
  3. number adjective
  4. countable adjective
विशेषण प्रश्न उत्तरे ६ ते १० | Visheshan mcq

प्रश्न 6 : अधोरेखित शब्दाची जात सांगा : वर-बाप’ 

  1. विशेषण 
  2. अव्यय 
  3. धातू 
  4. यापैकी नाही 

प्रश्न 7 : गुणविशेषण ओळखा? 

  1. गोड मध 
  2. 20 लिटर पाणी 
  3. अडीच मीटर कपडा 
  4. काही माणसे 

प्रश्न 8 : ‘मांढरदेवीच्या यात्रेला पुष्कळ लोक आले होते’ या वाक्यामधील आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान योग्य आहे? 

  1. हे अनिश्चित वाचक संख्या विशेषण आहे 
  2. हे आवृत्ती वाचक संख्या विशेषण आहे 
  3. हे क्रम वाचक संख्या विशेषण आहे 
  4. हे गणना वाचक संख्या विशेषण आहे 

प्रश्न 9 : गटात न बसणारे वाक्य निवडा 

  1. माझी सर्व पुस्तके पाण्यात भिजली
  2. आमच्या काकांना तिन्ही मुलीच आहेत
  3. आम्ही चारी भावंडे पुण्यातच शिकलो
  4. आजही दोन्ही भाऊ एकत्रच राहतात

प्रश्न 10 : अधोरेखित शब्दाची जात ओळखा : हा चौपदरी रस्ता आहे.

  1. विशेषण 
  2. नाम 
  3. सर्वनाम 
  4. भाववाचक नाम 

Adjective Questions Answers 6 to 10

Question 6 : State the gender of the underlined word : ‘father-in-law’

  1. Adjective
  2. wasted
  3. Metal
  4. None of these

Question 7 : Identify the adjective?

  1. Sweet honey
  2. 20 liters of water
  3. Two and a half meters of cloth
  4. some people

Question 8 : Which of the following statements is correct about the adjective in the sentence ‘Many people had come for Mandhardevi Yatra’?

  1. It is an adjective of indefinite number
  2. This version is a reader number adjective
  3. This sequence is a numerical adjective
  4. It is a counting reader number adjective

Question 9 : Choose the sentence that does not fit in the group

  1. All my books got soaked in water
  2. Our uncle has three daughters
  3. We four siblings studied in Pune
  4. Even today both brothers live together

Question 10 : Identify the caste of the underlined word : It is a four lane road.

  1. Adjective
  2. Noun
  3. Pronoun
  4. Meaningful name

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा. visheshan mcq